शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

नात्यातली लग्नं आटवताहेत राज्यातील रक्तसाठा! महिन्याला लागताहेत १३ हजारांवर रक्ताच्या पिशव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 10:24 AM

११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

कुंदन पाटील

जळगाव : नात्यातल्या नात्यात लग्न केल्यावर गर्भधारणावस्थेत नेमक्या  चाचण्या न केल्यामुळे राज्यात १३ हजारांवर ‘थॅलेसेमिया’ग्रस्त नवजात जन्माला आली आहेत. या नवजातांना नियमित रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्त साठ्यावर संकट आले आहे. त्यातील ११ हजार ५५३ नवजातांसाठी  शासनाने मोफत रक्ताची व्यवस्था करून दिली आहे.

एक नाडी किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाल्यास जन्माला येणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ग्रस्त बाळांची संख्या जास्त असते.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी 

वंशपरंपरेने व आनुवांशिकतेने जनुकांद्वारे दाम्पत्याकडून शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. त्यांचे पुढच्या पिढीत वहन होते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत एक जनुक आई वा वडिलांकडून अपत्यात शिरते, तर अनेकदा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येते. परिणामी, बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते. थॅलेसेमिया ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा गंभीर (मेजर) स्वरूपात असतो.

गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात

गर्भधारणा राहिल्यावर १० आठवड्यांच्या कालावधीत पोटातल्या बाळाची रक्तचाचणी करून निदान करता येते. गंभीर थॅलेसेमिया असल्यास गर्भपात करता येतो. त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे.    - डॉ. गौरव महाजन, बालरोगतज्ज्ञ, जळगाव. 

मोफत रक्त घेणारे थॅलेसेमिया रुग्ण

    मुंबई                ३१८१    पुणे                     १३१२    नागपूर                     ५७२    छ. संभाजीनगर     ५३६    ठाणे                     ५०६    जळगाव                      ४३७    नांदेड                           ४२६    अहमदनगर                ४१६    सांगली                        ३९०

    अकोला                    ३१५    अमरावती                ३११    सोलापूर                   २४४    कोल्हापूर                २२७    यवतमाळ                २१९    जालना                    २११    धुळे                         २०२    सातारा                   १८७    बीड                        १७२

    परभणी                  १६६    बुलढाणा                १५८    चंद्रपूर                   १५१    भंडारा                  १४९    लातूर                     १३९    वर्धा                      ११७    वाशिम                 ७५    हिंगोली                ५१    रायगड                ३९    नंदुरबार              ३२    सिंधुदुर्ग               २८    रत्नागिरी             २६    धाराशिव            २६    गोंदिया               ११    गडचिरोली         ०३    पालघर                १

एकुण ११५५३ एवढ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करावा लागत आहे.