दहशतवाद्यांचा लवकरच बीमोड : संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे

By Admin | Updated: June 10, 2017 18:11 IST2017-06-10T18:11:47+5:302017-06-10T18:11:47+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर परराष्ट्रीय धोरणात्मकरित्या पाकिस्तानला नमवण्यात यश मिळाले

Terrorists soon beheaded: Minister of State for Defense Dr. Subhash Bhamare | दहशतवाद्यांचा लवकरच बीमोड : संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे

दहशतवाद्यांचा लवकरच बीमोड : संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे

ऑनलाईन लोकमत

रावेर, जि. जळगाव, दि. 10 -  काश्मीर खो:यात नियंत्रण रेषेवर बर्फाच्छादीत प्रदेशातील  प्रतिकूल वातावरण व उणे 50 सेल्सीअंश तापमानात  जवान समर्थपणे देशाचे रक्षण करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर परराष्ट्रीय धोरणात्मकरित्या पाकिस्तानला नमवण्यात यश मिळाले असून काही काळात आपल्याला दहशतवाद्यांचा बीमोड झालेला दिसेल़ पाकिस्तान ज्या काही छुप्या घुसखोरी करून खोटा आव आणत आहे, त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानात घुसून वचपा काढण्याची हिंम्मत आपल्या सैन्यदलात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांनी तालुक्यातील पाल येथे केले.
पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समितीतर्फे आयोजित आदिवासी वंचित घटक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होत़े माजी खासदार डॉ़गुणवंतराव सरोदे, खासदार रक्षा खडसे, ए़टी़पाटील, जि़प़अध्यक्षा उज्‍जवला पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, वृंदावनधामचे गोपाळ चैतन्य महाराज, भाजपचे प्रदेश संघटन सचिव किशोर काळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Terrorists soon beheaded: Minister of State for Defense Dr. Subhash Bhamare