भुसावळात पिस्तूल, चाकू दाखवत केली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:04+5:302021-09-21T04:19:04+5:30

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील तरुणीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यासाठी मुलीच्या घरासमोर पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर दहशत घालण्याचा ...

Terror in Bhusawal showing pistol, knife | भुसावळात पिस्तूल, चाकू दाखवत केली दहशत

भुसावळात पिस्तूल, चाकू दाखवत केली दहशत

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील तरुणीशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यासाठी मुलीच्या घरासमोर पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर दहशत घालण्याचा प्रकार रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. याबाबत दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीतील रहिवाशाने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी आशिक असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. अयान कॉलनी) व त्याचा साथीदार (नाव माहीत नाही) यांनी १९ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पटेल कॉलनीत मुलीच्या घरासमोर त्या मुलीसोबत लग्न करण्याच्या हेतूने तिच्या घरच्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाबा काल्यासोबत असलेल्या त्याच्या साथीदाराने घरातील लोखंडी दरवाजावर फरशीचे तुकडे फेकून दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. तर, बाबा काल्याने हातात पिस्टल घेऊन, तर त्याच्या साथीदाराने हातात चाकू घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड केली. तसेच बाबा काल्याने 'मै सबको गोली मार दुंगा बाहर निकलो' अशी धमकी देऊन शिवीगाळ करून गल्लीत दहशत निर्माण केली. याबाबत घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच मुलीच्या वडिलांना धीर दिला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला हे तपास करीत आहे.

Web Title: Terror in Bhusawal showing pistol, knife