धरणगावानजीक भीषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:40+5:302020-12-04T04:43:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव, जि. जळगाव : दोन दुचाकींना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तीन तरुण ठार ...

धरणगावानजीक भीषण
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव, जि. जळगाव : दोन दुचाकींना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तीन तरुण ठार झाल्याची घटना धरणगावापासून जवळच असलेल्या निशाणे फाट्याजवळ बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व कापूस जिनिंगमध्ये मजूर होते.
सुना मोहनलाल भिलाला (२३, रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला तर नारायण लालसिंग बारेला (२०) व दिलीप बारेला (२५, दोन्ही रा. साळवा) यांना दवाखान्यात नेत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मोटरसायकलवरून तीन जण साळवा येथून बांभोरीकडे तर अन्य एका मोटरसायकलवरून तीन जण कासोदा येथून मध्य प्रदेशकडे जात होते. त्याचवेळी निशाणे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाने या दाेन मोटरसायकलींना जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होत की, दोन मोटरसायकलींवरील सहा जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
यात सुना भिलाला हा जागीच ठार झाला तर इतर पाच जण जखमी झाले. या जखमींना शिवसेना कार्यकर्ते मोतीलाल पाटील यांनी आपल्या वाहनातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉ. गिरीश चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी रुग्णालयात एकच गर्दी उडाली होती.
नारायण बारेला, दिलीप बारेला, पिंकी मूहलाल भिलाला (२२), संगीता सीताराम भिलाला (१४, दोघे रा. मध्य प्रदेश), भरत बारेला (२५, रा. साळवा) या पाच जणांवर उपचार करून जळगावला पाठविण्यात आले. वाटेतच नारायण व दिलीप बारेला यांचा मृत्यू झाला. हे सर्व कापूस जिनिंगमध्ये काम करणारे मजूर असल्याचे कळते.