चोसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजपासून निविदा प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:50+5:302021-09-04T04:21:50+5:30

बाजार समितीच्या यार्डात असलेल्या साखर कारखाना कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, संचालक आनंदराव रायसिंग, नीलेश ...

Tender process for leasing of Chosaka from today | चोसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजपासून निविदा प्रक्रिया

चोसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजपासून निविदा प्रक्रिया

बाजार समितीच्या यार्डात असलेल्या साखर कारखाना कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, संचालक आनंदराव रायसिंग, नीलेश पाटील, प्रवीण गुजराथी, प्रदीप पाटील, सुनील महाजन, अनिल पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, सचिव आधार पाटील, के.एम. पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

चोपडा साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, घनश्याम अग्रवाल, पीपल्स बँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन चंद्रहास गुजराती, माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील यांनी पाठपुरावा केला.

दरम्यान, २० सप्टेंबरनंतर निविदेची प्रक्रिया संपणार असून भाड्यावर कोण घेतं हे निश्चित होणार आहे. त्यामुळे या वर्षीचा गाळप हंगाम निश्चित सापडेल असा विश्वासही चेअरमन ठाकरे यांनी व्यक्त केला. यावर्षी जवळपास चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणि आजूबाजूच्या परिसरात अडीच ते तीन लाख टन ऊस उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

चोपडा तालुक्यात चोसाका एकमेव असा मोठा प्रकल्प बंद पडला असल्याने पुन्हा तो भाडेतत्त्वावर देऊन का असेना सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच कारखाना सुरू झाल्यानंतर त्यात हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल, पुन्हा परिसरात नवसंजीवनी निर्माण होईल, असा आशावाद कर्मचारी, शेतकरी, कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यामध्ये निर्माण होणार आहे.

Web Title: Tender process for leasing of Chosaka from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.