दस:याच्या मुहूर्तासाठी वाहन बुकिंग जोरात

By Admin | Updated: October 18, 2015 00:56 IST2015-10-18T00:56:58+5:302015-10-18T00:56:58+5:30

विजयादशमीला वाहन खरेदीसाठी ग्राहकांकडून वाहन बुकिंग जोरात सुरू आहे.या दिवशी 1000 ते 1500 दुचाकी तर दीडशे चारचाकी रस्त्यावर येण्याची अपेक्षा आहे.

Ten: Vehicle booking loud for this museum | दस:याच्या मुहूर्तासाठी वाहन बुकिंग जोरात

दस:याच्या मुहूर्तासाठी वाहन बुकिंग जोरात

 

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीला वाहन खरेदीसाठी ग्राहकांकडून वाहन बुकिंग जोरात सुरू आहे. या दिवशी 1000 ते 1500 दुचाकी तर दीडशे चारचाकी रस्त्यावर येण्याची अपेक्षा आहे.

दुचाकी वाहन हे सध्या आवश्यक बाब झाली आहे तर वेगवेगळ्य़ा योजनांमुळे चारचाकी घेणेही आता सोयीचे होऊ लागल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असते. त्यात अनेक जण मुहूर्तावर वाहन घेणे पसंत करतात. अशाच प्रकारे चार दिवसांवर आलेल्या या मुहूर्तासाठी अनेकांनी वाहन बुकिंग केले आहे.

हजारावर दुचाकी

दुचाकींची बुकिंग संख्या पाहता 1000 वर पोहचली आहे. त्यात अजून चार दिवस शिल्लक असल्याने त्यात भर पडण्याची शक्यता आहे. त्यात अनेक मॉडेल ऐनवेळेवर उपलब्ध होत नाही त्यामुळे आठवडय़ाभरापासूनच बुकिंग केले जात आहे. सध्या अनेक मॉडेल उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे, मात्र ग्राहकांची मागणी पाहता विजयादशमीला ते ग्राहकांना उपल्बध करून दिले जातील, असे अनेक वाहन विक्रेत्यांनी सांगितले. सध्या वाहन खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून विक्रेत्यांकडूनदेखील विविध मॉडेल उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.

वाहन बुक करण्यासाठी अनेकजण आपल्या कुटुंबासोबत येत असल्याने शो रुममध्ये सध्या गर्दी दिसत आहे. यामध्ये घरातील सर्वाच्या पसंतीच्या रंगाच्या वाहनाची निवड केली जात आहे. त्यामुळे पसंतीच्या रंगानुसार वाहन उपलब्ध करुन देण्यासाठीही विक्रेते सरसावले आहेत.

चारचाकी वाहनांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजयादशमीला साधारण दीडशे नवीन चारचाकी रस्त्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातील एकाच शोरुममधून शुक्रवार, शनिवार या दोनच दिवसात 50 चारचाकींचे बुकिंग झाले आहे. यात भर पडणार आहे.

Web Title: Ten: Vehicle booking loud for this museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.