धुळ्यातील दहा जणांना प्रातांधिकाऱ्यांनी केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:41 PM2017-11-20T16:41:45+5:302017-11-20T16:50:15+5:30

धुळे प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर पोलिसांकडून अंमलबजावणी सुरु

Ten exiles from Dhule have been expelled | धुळ्यातील दहा जणांना प्रातांधिकाऱ्यांनी केले हद्दपार

धुळ्यातील दहा जणांना प्रातांधिकाऱ्यांनी केले हद्दपार

Next
ठळक मुद्देधुळे शहरातील तिघांना दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारधुळे शहरातील आझादनगर हद्दीतील दोघे एक वर्षांसाठी हद्दपारधुळे शहरातील देवपूर हद्दीतील चौघांना केले हद्दपार

आॅनलाईन लोकमत
धुळे, दि. २० - सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या दहा जणांवर हद्दपारीची कारवाई प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी सोमवारी केली. त्यात धुळे शहर हद्दीतील ३ जणांचा समावेश आहे़
धुळे शहरातील गणेश रवींद्र्र सूर्यवंशी, बंटी उर्फ रामदास आण्णा गायकवाड (गुरुपपैय्या) आणि मिलींद राजेंद्र आवटे या तिघांना २ वर्षासाठी धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले़
धुळे शहरातील आझादनगर हद्दीतील पवन उर्फ भुऱ्या वाघ आणि वसीम जैनोद्दीन शेख या दोघांना भादंवि कलम ५६ १-(अ) प्रमाणे १ वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़
शहरातील पश्चिम देवपूर हद्दीतील सुनील रामु मरसाळे याला भादंवि कलम ५६ १-(अ) प्रमाणे १ वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़
धुळे शहरातील देवपूर हद्दीतील चौघांना हद्दपार केले आहे़ यात विरेंद्र चंद्रभान अहिरे याला ५६ १-(अ) प्रमाणे १ वर्षाच्या मुदतीकरिता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़ तसेच शक्ती रमेश अकवारे, रवि पन्नालाल चत्रे आणि गोविंद मैकुलाल चित्ते या तिघांना ५६ १-(अ) प्रमाणे ६ महिन्याच्या मुदतीकरीता धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे़

Web Title: Ten exiles from Dhule have been expelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस