टेम्पोची ट्रकला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:51 IST2019-06-30T18:51:32+5:302019-06-30T18:51:44+5:30
एक जागीच ठार, दळवेलनजीकची घटना

टेम्पोची ट्रकला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा, जि.जळगाव : पारोळा-धुळे आशिया महामार्ग ४६ वर दळवेल गावानजीक गतिरोधकावरून पुढे जात असलेल्या ट्रकवर मागील बाजूने टेम्पो धडकल्याने टेम्पोमधील सहचालक जागीच ठार झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, ही घटना ३० जून रोजी सकाळी साडेअकराला घडली.
सय्यद अब्दुल वहाब रा नागपूर हा आपल्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एमएच-२८-एबी-७०६५ हा नागपूर येथून फिनाईलचे डबे व इतर साहित्य घेऊन मुंबई येथून नागपूरकडे निघाला होता. पारोळा-धुळे रोडवर दळवेल गावानजीक असलेल्या गतिरोधकावर वेगावर नियंत्रण न करता आल्याने पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून धडकला. त्यात सहचालक रज्जभ अली (वय १८, रा.ओरीपूर, ता.गौरीगंज, जि.अमेठी) याच्या चेह-यास जबर मार लागून तो जागीच ठार झाला. चालक सय्यद वहाब याला गंभीर दुखापत झाली. जखमीस रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी रुग्णवाहिकेतून तत्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे व डॉ.राहुल लुणावत यांनी प्राथमिक उपचार केले.