Tell us about Satsang ceremony at Balwadi | बलवाडी येथे सत्संग सोहळ्याची सांगता

बलवाडी येथे सत्संग सोहळ्याची सांगता

निंभोरा बु. ता. रावेर : येथून जवळच असलेल्या बलवाडी येथील श्रृंगधाम आश्रमात श्रृंगऋषी सेवा आश्रम व बहुउद्देशीय संचालक मंडळ यांच्यातर्फे तीन दिवसीय भव्य सतसंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता पालखी सोहळ्याने झाली.
पालखीचे नेतृत्व बलवाडी येथील ईश्वर महाराज, प्रा.गोपाल महाजन, निंभोरा येथील सुभाष महाराज, महिला दक्षता समिती सदस्या आशा धनगर, नंदनी पंत व सहकाऱ्यांनी केले. नंतर आश्रमात ह.भ.प देवगोपालजी शास्त्री आडगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. व्यासपीठावर प.पु.परमानंद महाराज जीन्सी, प.पु. कोठारी स्वामी चरणदासजी गुजरात, सावदा स्वामीनारायण मंदिराचे मोहनप्रसादजी महाराज, दिव्य प्रकाशजी महाराज जळगाव, तरुणसागर स्वामी महाराज, शिवचैतन्य महाराज पाल, नवनित चैतन्य महाराज पाल, सुभाष महाराज निंभोरा, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, विवेक ठाकरे, ईश्वर महाराज बलवाडी, नारायण महाराज आदी उपस्थित मान्यवर होते. कार्यक्रमात सजीव देखाव्याने भाविकांचे मन मोहून टाकले.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यक्रमास हजेरी लावली. मान्यवरांचे स्वागत संस्थानचे अध्यक्ष भागवत महाजन, संतोष महाजन, माजी जि.प. सदस्य विनोद पाटील, बाळु महाराज, पाडूरंग पाटील, विष्णू महाजन, चंद्रकांत कोळी, भास्कर चौधरी, भागवत महाजन, माजी उपसरपंच जितेंद्र महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप सोनवणे यांनी केले.
यावेळी ७ ते ८ हजार भाविक भक्त उपस्थित होते.

Web Title: Tell us about Satsang ceremony at Balwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.