नांदेडला जीर्णोद्धार कार्यक्रमाची ग्रामभोजनाने सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:36+5:302021-09-06T04:19:36+5:30
नांदेड : ता. धरणगाव : येथील मुख्य गावठाण चौकाजवळील मारुतीच्या पारावरील महादेवाच्या पिंडीच्या जीर्णोद्वाराचा कार्यक्रम दि. १ ते ४ ...

नांदेडला जीर्णोद्धार कार्यक्रमाची ग्रामभोजनाने सांगता
नांदेड : ता. धरणगाव : येथील मुख्य गावठाण चौकाजवळील मारुतीच्या पारावरील महादेवाच्या पिंडीच्या जीर्णोद्वाराचा कार्यक्रम दि. १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाला. या कालावधीत गावात धार्मिक भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
वरणपोळी आणि वांग्याची भाजी या महाप्रसादाच्या ग्रामभोजनाच्या गाव पंगतीने कार्यक्रमाची सांगता झाली. येथील मारुतीच्या पारावरील महादेवाची पिंड व नंदीची मूर्ती अतिशय जीर्ण झालेली होती. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून पिंडीच्या जीर्णोद्वारासह मारुती व नागनाथाच्या मंदिरावर स्लॅब टाकून मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते.
गावातील ग्रामस्थांसह बाहेरगावी नोकरी व व्यवसायानिमित्त गेलेल्या गावातील ग्रामस्थांनीदेखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देऊन कार्यक्रमास हातभार लावला होता. ४ रोजी महाप्रसाद म्हणून ग्रामभोजनाच्या गावपंगतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
050921\img-20210904-wa0024.jpg
नांदेडला जीर्णोद्धार कार्यक्रमाच्या महाप्रसादाच्या महीलांच्या ग्रामभोजनाच्या पंगतीचे दृष्य