केºहाळे येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:44 IST2019-04-06T21:44:03+5:302019-04-06T21:44:41+5:30

घेतला गळफास

Teenage Suicide At K. Hale | केºहाळे येथे युवकाची आत्महत्या

केºहाळे येथे युवकाची आत्महत्या

रावेर : तालुक्यातील केºहाळे बुद्रूक येथील इंदिरा नगरमधील रहिवासी राहूल संजय सावळे (वय २३) या युवकाने शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेपूर्वी दीपक मुरलीधर पाटील यांच्या शेताच्या बांधावरील झाडाला ठिबक सिंचनच्या नळीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राहुल संजय सावळे हा गत चार-पाच दिवसांपासून मानसिक तणावात वावरत होता. तो कुणाशी काही एक बोलत नव्हता. दरम्यान, शुक्रवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास तो घाईत घराबाहेर पडला. त्यास कुठे जात असल्याबद्दल हटकले असता तो काही एक न सांगता निघून गेला. मात्र रात्री १० वाजेपर्यंत उशिरा घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. आकाश सुनील सावळे यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्रीराम वानखेडे तपास करीत आहेत.

Web Title: Teenage Suicide At K. Hale