युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:51 IST2019-05-28T15:51:24+5:302019-05-28T15:51:55+5:30
मावशीच्या घरी घेतला गळफास

युवकाची आत्महत्या
भडगाव : तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे अमोल भिकन सोनवणे (२०) या तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता उघडकीस आली.
अमोल हा द्वितीय वर्ष कला या वर्गात शिकत होता. त्याने मावशीच्या घरात आतून कडी लाऊन दुसऱ्या खोलीत घराच्या छताच्या कडीला दोर बांधून आत्महत्या केली. या वेळी घरातील सर्व लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला शरद पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.