कोरोना प्रतिबंधासाठी शिक्षक संकलित करणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST2021-05-25T04:17:40+5:302021-05-25T04:17:40+5:30
कजगाव, ता. भडगाव : कोरोनासाठी शिक्षक संघटनांनी आपापल्यापरीने निधी संकलन करून तो शासनाकडे सुपुर्द करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या ...

कोरोना प्रतिबंधासाठी शिक्षक संकलित करणार निधी
कजगाव, ता. भडगाव : कोरोनासाठी शिक्षक संघटनांनी आपापल्यापरीने निधी संकलन करून तो शासनाकडे सुपुर्द करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
भडगाव येथे सभापती डॉ. अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी वाघ, गटशिक्षणाधिकारी परदेशी तसेच शिक्षणविस्तार अधिकारी गणेश पाटील उपस्थित होते. बैठकीत कोविड-१९च्या बाबतीत आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सर्व शिक्षकांनी जमेल तेवढी आर्थिक मदत देऊन शासनास मदत करावी, असे आवाहन सभापती डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी वाघ यांनी केले. त्यास सर्व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी होकार दिला. केंद्रप्रमुख यांच्यामार्फत येत्या आठ दिवसांत निधी संकलन करून त्या निधीमधून काही वस्तू कोविड रुग्णांसाठी घेऊन त्या शासनाकडे सुपुर्द कराव्यात, असे ठरले. मनोज पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.