शिक्षकांचे कुटुंबासह शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:59+5:302021-08-18T04:21:59+5:30
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत वाद सुरू असताना शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यामुळे मानसिक, शारीरिक व ...

शिक्षकांचे कुटुंबासह शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण
जळगाव : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत वाद सुरू असताना शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मूळ आस्थापनावर पुन्हा बदली करण्यात यावी, या मागणीसाठी चार ते पाच शिक्षकांकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी दालनासमोर उपोषण करण्यात आले.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत वाद असताना आठ ते दहा शिक्षकांची बदली करण्यात आली. या बदल्यांना दोन वेळेस मान्यता नाकारण्यात आली; मात्र तरीही राजकीय दबावातून मान्यता मिळवून बदली झालेल्या शाळेतून पगार काढण्यात आले. या माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती उपोषणकर्ते शिक्षकांनी दिली, तसेच कुणीही बदलीसाठी अर्ज केलेला नाही. तर संस्थेचे परिशिष्ठ १ हे न्यायप्रविष्ठ आहे, असेही शिक्षकांकडून सांगण्यात आले. न्याय मिळावा व मूळ आस्थापनेवर बदली व्हावी, यासाठी चार शिक्षकांनी सकाळपासून कुटुंबासह माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला होता. त्यामध्ये उपशिक्षक संदीपकुमार बोरसे, कृष्णराव विसावे, संतोष गोस्वामी, देवराम ठाकरे यांचा समावेश होता.