सर्वेक्षणाआधी शिक्षकांना आधी कोरोना लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:01+5:302021-03-28T04:16:01+5:30
जळगाव : माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या आधी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे व सर्वेक्षणातून ...

सर्वेक्षणाआधी शिक्षकांना आधी कोरोना लस द्यावी
जळगाव : माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या आधी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे व सर्वेक्षणातून विकलांग व आजारी व्यक्तींना वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्वेक्षण राबविले जाणार आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोविड सदृश्य रूग्ण सर्वेक्षण मोहिमेत सहभागी करून घेण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. या आधी शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यावेळी कुठलीही सुविधा न पुरविल्यामुळे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. काहींचा मृत्यू झाला. त्यामुळे आता तरी शिक्षकांना लसी देण्यात याव्यात व कीट पुरविण्यात यावे. तसेच आजारी व विकलांग व्यक्तींना या सर्वेक्षणातून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ व सोमनाथ पाटील यांच्या स्वाक्ष-या आहेत.