शिंदाड ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:57+5:302021-09-07T04:20:57+5:30
यावेळी उपस्थित होते. यावेळी इयत्ता १०वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी अश्विनी विनायक पाटील, द्वितीय विशाल भगवान मोरे, वैष्णवी इंदल ...

शिंदाड ग्रामपंचायतीतर्फे शिक्षकांचा सन्मान
यावेळी उपस्थित होते. यावेळी इयत्ता १०वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी अश्विनी विनायक पाटील, द्वितीय विशाल भगवान मोरे, वैष्णवी इंदल परदेशी व मयुरी रवींद्र चौधरी, तर तृतीय मनीष सुनील पाटील यांचा गौरव करण्यात आला. शिंदाड शाळेतील समाज विकास विद्यालयाचे आजी-माजी शिक्षक, जि. प. शाळेचे शिक्षक तसेच गावातील रहिवाशी व बाहेरगावी शाळेला शिक्षक असलेले अशा १०१ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास निवृत्त शिक्षक प्रल्हाद वना पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, प्रल्हाद पाटील, आदर्श शिक्षक सुभाष देसले, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हिलाल पाटील, माजी सरपंच कैलास पाटील, शाळेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी मुख्याध्यापक आर. के. चौधरी, एस. डी. पाटील, मुख्याध्यापक ए. पी. गव्हाळे, मीना नेहरकर, प्रशांत पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, अकिल तडवी, उज्ज्वला पाटील, मीराबाई परदेशी, कांताबाई पाटील, जनाबाई पाटील, ठगूबाई धनगर, नजमबाई तडवी, लालबी तडवी, कांचन परदेशी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. पी. पाटील, नामदेवराव पाटील यांनी, प्रास्ताविक नरेंद्र पाटील, तर आभार संदीप सराफ यांनी मानले.