शिक्षक दिनी आदर्श शिक्षक गुरुजनांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:09+5:302021-09-07T04:20:09+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक सदानंद धडू भावसार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, शिवाजी ...

शिक्षक दिनी आदर्श शिक्षक गुरुजनांचा सत्कार
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक सदानंद धडू भावसार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, शिवाजी हायस्कूलचे शिक्षक रावसाहेब भोसले, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गिरीश वाणी, एन. ई. एस. हायस्कूलचे प्राचार्य पी. के सौंजे, कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मोरणकर, लाड शाखीय वाणी समाज मंडळ अध्यक्ष किरण वाणी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली श्यामकांत मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. युगंधरा युथ फाउंडेशन सदस्य नितीन शिनकर, अमोल शिरोळे, भूषण प्रकाश टिपरे, कुशल शिरोळे, सचिन नावरकर या सदस्यांनी स्वखर्चाने आणलेल्या शवपेटीचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दातृत्व संपन्न सदस्यांनी कोरोनाकाळातदेखील चांगले मदत कार्य केल्याने त्यांचाही या वेळी दत्तलीला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष विजय नावरकर, हेमकांत मुसळे, शरद मेखे, योगेश वाणी, प्रसाद नावरकर, कैलास कोठावदे, सत्यजीत शिरोळे, कुंदन अमृतकर, मंगेश शिरोळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी अध्यक्ष किरण वाणी यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा एक भाग म्हणून गणेश चतुर्थी ते अनंत चतुदर्शी या काळात समाजात कन्यारत्न होणाऱ्या कुटुंबीयांस ११ हजार रुपये ‘कन्या भूषण’ योजनेंतर्गत देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शरद मेखे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विजय नावरकर यांनी मानले.