कट मारल्याने दुचाकीवरून फेकला गेलेला शिक्षक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:13+5:302021-07-23T04:12:13+5:30
चेतन रावसाहेब पाटील (४४, भडगाव रोड चाळीसगाव) हे एमएच१९/डीई७८७४ या दुचाकीवरून हिरापूरकडून चाळीसगाव शहराकडे येत असताना चाळीसगावकडून ...

कट मारल्याने दुचाकीवरून फेकला गेलेला शिक्षक जागीच ठार
चेतन रावसाहेब पाटील (४४, भडगाव रोड चाळीसगाव) हे एमएच१९/डीई७८७४ या दुचाकीवरून हिरापूरकडून चाळीसगाव शहराकडे येत असताना चाळीसगावकडून हिरापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच१९/सीवाय६२५१ या मालवाहू पिकअपचालकाने कट मारला. त्यामुळे चेतन पाटील हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच चेतन पाटील यांच्या मित्रांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत त्यांना ट्राॅमा केअर सेंटरमध्ये दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे जबर नुकसान झाले. मृत चेतन पाटील हे देवळी ता. चाळीसगाव येथील आश्रमशाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होते.
याप्रकरणी प्रताप लक्ष्मण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालवाहू पिकअपचालक किशोर ऊर्फ बबलू यादव माळी (३२, बहाळ कसबे) याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०४अ, २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम १८४, १३४बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.