विहिरीत पडून शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 22:49 IST2020-08-13T22:49:50+5:302020-08-13T22:49:58+5:30

पद्मालय शिवारातील घटना

Teacher dies after falling into well | विहिरीत पडून शिक्षकाचा मृत्यू

विहिरीत पडून शिक्षकाचा मृत्यू


एरंडोल : संदीप गोविंदा शिंगणे ( ३९ ) मूळ राहणार अमळनेर हल्ली मुक्काम एरंडोल यांचा १३ रोजी पद्मालय शिवारातील किरण रघुनाथ पाटील यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या संदर्भात माहिती मिळताच काही जणांनी विहिरी भोवती गर्दी केली होती. तसेच काही जणांनी पोलिसांना याची माहिती कळविताच पोलीस येथे दाखल झाले होते.
याबाबत रोहित योगराज भोई यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून रजिस्टर नंबर २५/२० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. संदीप शिंगणे हे रिंगणगाव येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांची १८ वर्ष सेवा झाली आहे.

Web Title: Teacher dies after falling into well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.