शिक्षक दाम्पत्य करणार देहदान
By Admin | Updated: January 4, 2017 00:13 IST2017-01-04T00:13:36+5:302017-01-04T00:13:36+5:30
धुळे : शहरातील साक्री रोडवरील जय मल्हारनगरातील रहिवासी श्रीराम पानपाटील व अरुणा पानपाटील या शिक्षक दाम्पत्याने नवीन वर्षानिमित्त देहदानाचा संकल्प केला आहे़

शिक्षक दाम्पत्य करणार देहदान
धुळे : शहरातील साक्री रोडवरील जय मल्हारनगरातील रहिवासी श्रीराम पानपाटील व अरुणा पानपाटील या शिक्षक दाम्पत्याने नवीन वर्षानिमित्त देहदानाचा संकल्प केला आहे़
शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अर्ज भरून संकल्प केला असून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे़ या मरणोत्तर देहदानामुळे गरजूंना अवयवांचा लाभ मिळणार आहे़ देहदानासाठी त्यांना कापडणे आरोग्य केंद्राचे नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. व्ही़ के़ सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले़ या संकल्पानिमित्त त्यांचे अभिनंदन होत आहे़