शिक्षकाने दिला कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना जनजागृतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:44+5:302021-07-22T04:11:44+5:30

धरणगाव : येथील महात्मा फुले युवा क्रांती मंचचे अध्यक्ष, बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सराजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाचे ...

The teacher conveyed the message of corona awareness through kirtan | शिक्षकाने दिला कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना जनजागृतीचा संदेश

शिक्षकाने दिला कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना जनजागृतीचा संदेश

धरणगाव : येथील महात्मा फुले युवा क्रांती मंचचे अध्यक्ष, बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सराजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, माउली वारकरी शिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी आर.डी. महाजन (महाराज) यांचे आषाढी एकादशी निमित्ताने येथील माउली वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कीर्तन झाले. याप्रसंगी त्यांनी पंढरी परमात्म्याचा वर्णन करणारा ‘पंढरीचे भूत मोठे’ हा अभंग घेतला होता. याप्रसंगी आलेल्या भाविक भक्तांना त्यांनी समाजात वावरताना, कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करायला सांगितले. त्याचप्रमाणे, झाडे लावा आणि झाडे जगवा, तेच आपल्याला तारणारे आहेत, असा संदेश दिला, तसेच तरुणांमध्ये असलेल्या व्यसनाधीनतेवर त्यांनी ताशेरे ओढत तरुणांना ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायला सांगितला. ‘तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे’ याप्रमाणे आयुष्य जगा. आई, वडिलांना अभिमान वाटेल, असं जीवन जगण्याचा संदेश तरुणांना दिला. त्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल राज्याभिषेकानंतर औरंगजेबाने काढलेले उद्गार जसेच्या तसे म्हणून दाखवत जोरदार टाळ्या मिळविल्या.

याप्रसंगी महामंडलेश्वर भगवानदासजी महाराजांचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. कीर्तनाला गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

फोटो कॅप्शन: कीर्तन करताना आर.डी. महाजन व उपस्थित भाविक. २२/४

210721\img_20210720_131457.jpg

फोटो कॅप्शन: कीर्तन करतांना आर. डी. महाजन व उपस्थित भाविक.

Web Title: The teacher conveyed the message of corona awareness through kirtan