शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन शिक्षकाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:49 PM

शाळेतून परतल्यावर संपविली जीवनयात्रा

ठळक मुद्देप्रचंड आक्रोश आणि खळबळ

जळगाव : भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी समोर असलेल्या ज्ञानचेतना सोसायटीमधील अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या जगन्नाथ विठ्ठल पाटील (वय ४५) या शिक्षकाने शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजेच्या दरम्यान पाचव्या मजल्यावरुन जिन्याच्या खिडकीतून स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. ताणतणावातून ही आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जगन्नाथ पाटील यांनी उडी घेतल्यानंतर मोठा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या त्यांचा चिमुरडा मुलगा हिमांशू (वय १२) याने काय झाले म्हणून पहाण्यासाठी धाव घेतली असता जन्मदेत्या बापाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्याने भेदरलेल्या स्थितीत पळत जाऊन आईला हा प्रकार सांगितला. अतिशय भीषण दृष्य घटनास्थळी होते.या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, अजिंठा हौसिंग सोसायटी परिसरात असलेल्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सिद्धी विनायक शाळेतील माध्यमिकच्या वर्गांना शिकवत असलेले शिक्षक जगन्नाथ विठ्ठल पाटील हे सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेले. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेच्या दरम्यान शाळेत परीक्षा होती. दोन विषयांची चाचणी परीक्षा आटोपल्यावर ११ वाजेपर्यंत जगन्नाथ पाटील हे शाळेत होते. सहकारी शिक्षकांशी त्यांनी संवादही साधला. त्यानंतर ते घरी परतले.प्रचंड आक्रोश आणि खळबळघटनास्थळाचे भीषण दृश्य पाहून कॉलनीतील नागरिकांचाही थरकाप उडाला होता. जगन्नाथ पाटील यांच्या पत्नीकडून सिद्धीविनायक शाळेचा नंबर घेऊन काही जणांना तात्काळ शाळेत माहिती कळविली. शाळेतील पुरूष व महिला शिक्षकांनी तात्काळ जगन्नाथ पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. महिलांनी जगन्नाथ पाटील यांच्या घरात जाऊन त्यांना धीर देण्यास सुरूवात केली. शाळेतील शांत, स्वभावी शिक्षक एक तासांपूर्वी आपल्याशी चर्चा करून बाहेर पडतो व आत्महत्या करतो या प्रकाराने सहकारी शिक्षकवर्गही हादरला होता. घटनास्थळावरील चित्र एवढे भयंकर होते की वरून पडलेल्या जगन्नाथ पाटील यांची कवटी फुटून आतील मांस दहा-ते बारा फुटांपर्यंत उडाले होते.पोलिसांनी घेतली धावघटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अशोक सनगत, अतुल वंजारी, प्रकाश पाटील, विजय नेरकर यांनी घटनास्थळ गाठून चौकशीची प्रक्रिया सुरू केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास पंचनाम्याची प्रक्रिया आटोपून मृतदेह सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला.पाटील हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातीलजगन्नाथ पाटील हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडिल विठ्ठल पाटील हे रेल्वे आरएमएसमधून निवृत्त झाल्यानंतर सध्या भुसावळ येथे रहातात. जगन्नाथ पाटील यांना असलेल्या दोन मुलांपैकी एक मुलगा अभिषेक (वय १७) हा आजोळी धुळे येथे असल्याचे सांगण्यात आले. तो तेथे अभियांत्रिकीचे (डिप्लोमा) शिक्षण घेतो. त्यांच्या पत्नीचे माहेर हे धुळे येथील असल्याचे सांगण्यात आले. घटनेबाबात सर्वांना माहिती कळविताच नातेवाईकांनी धाव घेतली.मुलगा हिमांशू अतिशय घाबरलाघरात पत्नी नंदा यांनी स्वयंपाकाची पूर्ण तयारी केलेली दिसत होती. भाजी तयार करून पोळ्यांची कणीकही त्यांनी भिजवून ठेवलेली दिसत होती. मुलगा हिमांशू हा घरात अतिशय घाबरलेल्या स्थितीत निशब्द होऊन थरथर कापत उभा होता. शेजारील महिलांनी त्याला शांत करण्यासाठी बेडरूमकडे नेण्याचा प्रयत्न केला असता तिकडे जाण्याचीही त्याला हिंमत होत नव्हती. समोर आई हंबरडा फोडून रडत असल्याने तो अधिकच घाबरलेला दिसत होेता.शनिवारी होणार शवविच्छेदनमयत जगन्नाथ पाटील यांचे आई वडिल दुपारी जळगावी दाखल झाले. घरी पोहोचल्यावर आईला एकदम धक्का बसला. त्यांची तातखिळी बसल्याने त्यांना उपचारार्थ तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन शनिवारी १९ रोजी सकाळी होईल. त्यांची बहिणही अद्याप येणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वडिल किर्तनकारमयत जगन्नाथ पाटील यांचे वडिल विठ्ठल पाटील हे जिल्ह्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तर स्वत: जगन्नाथ हे उत्तम तबला वादक आहेत. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य कार्यक्रमांना तेच तबला वादन करायचे. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची आठवण येईल, असेही त्यांचे सहकारी शिक्षक सांगतात.पत्नीला म्हणाले जरा उन्हात जाऊन येतोया सोसायटीत पाटील हे पहिल्या माळ्यावर रहातात. घरी परतल्यावर जगन्नाथ पाटील तासभर घरातच होते. त्यांनी पत्नी नंदा पाटील यांच्याशी चर्चा केली. तू स्वयंपाक कर मला थंडी वाजते आहे जरा गच्चीवर जाऊन उन्हात उभा रहातो असे सांगून १२.१५ वाजेच्या दरम्यान जगन्नाथ पाटील हे पाचव्या मजल्याकडे गेले. या ठिकाणी गच्चीच्या पॅसेजला काचेची खिडकी आहे. तीन ते साडेतीन फुट उंच ही जागा असल्याने छोट्या बेंचवर चढून जगन्नाथ पाटील यांनी स्वत;ला खाली झोकून दिले.खाली खेळणाºया मुलाला आला आवाजजगन्नाथ पाटील हे पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रहातात. घरी पत्नी नंदा या तसेच लहान मुलगा हिमांशू असे तिघे रहातात. हिमांशू हा रायसोनी इग्लिश मिडियमला शिकतो. तो प्रशस्त इमारतीच्या मोकळ्या जागेत घटना घडली त्यावेळी खेळत होता. जोरात आवाज झाल्याने तो आवाजाच्या दिशेने धावला. पुढे जाऊन पहातो तर प्रत्यक्ष आपला पिता रक्ताच्या थारोळ्या पडलेला त्याने पाहीला. हा प्रकार पाहून तो अतिशय भेदरलेल्या स्थितीत घराकडे परतला. तोपर्यंत सोसायटीतील नागरिकही घटनास्थळाकडे धावून गेले. हिमांशू ने घडलेली घटना आईला सांगताच त्यादेखील प्रचंड घाबरल्या.