शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:31+5:302020-12-04T04:45:31+5:30
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल येथे आयोजित ‘नेशन बिल्डर अॅवार्ड-शिक्षक सन्मान‘ पुरस्कार सोहळ्यात ते ...

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे शिल्पकार
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल येथे आयोजित ‘नेशन बिल्डर अॅवार्ड-शिक्षक सन्मान‘ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार, मानद सचिव जितेंद्र बरडे यांची उपस्थिती होती.
या सोहळ्यात समिधा सोहनी (महाराणा प्रताप विद्यालय) अर्चना चौधरी (नंदिनीबाई वामनराव विद्यालय), राहुल चौधरी (शकुंतला प्राथ.विद्यालय), सचिन महाजन (सि.ग.भंगाळे विद्यालय), मनोज कुलकर्णी (के.नारखेडे,भुसावळ), तेजस मराठे (कबचौउमवि), चित्रा महाजन (विश्व मंगल योग केंद्र), मंजूषा भिडे (पलोड पब्लीक स्कूल), डॉ. जगदिश पाटील (जि.प.शाळा कंडारी), रुपाली कोठावदे (भगीरथ), हर्षा पाठक (विद्या विकास मंदिर), रागिणी पुराणिक (प.न.लुंकड कन्या शाळा), शैलेश शिरसाठ (जि.प.शाळा, धरणगांव), जयांशू पोळ (आर.आर.विद्यालय), नामदेव सोनवणे (आर.आर.विद्यालय), अनिलकुमार महाजन (जि.प.शाळा जळगांव), मनिषा शिरसाठ (जि.प.शाळा पाळधी), राधिका सरोदे (सेंट टेरेसा), निलीमा तारवटे (श्रवण विकास मंदिर), मुकेश पाटील (जि.प.शाळा कानळदा), कपिल शिंगणे (एम.जे.कॉलेज), अजित चौधरी (प्राथमिक विद्या मंदिर,जळगांव), सोमनाथ पाटील (जि.प.शाळा, जळके तांडा), राजश्री कुलकर्णी (अनुभूती इंग्लिश स्कूल), सविता दातार (ला.ना.विद्यालय), अश्विनी देशपांडे (विद्या विकास मंदिर), निलेश मोरे (त्र्यंबक नगर विद्यालय), वैशाली झोपे (नंदिनीबाई वामनराव विद्यालय), डॉ. विजय बागुल (जि.प.शाळा धरणगांव), रविंद्र काटे (जि.प.शाळा बोरनार), सरोज तिवारी (अभिनव विद्यालय), दिपनंदा पाटील (जे.एस.शिंदे विद्यालय जळगांव) आदि शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अॅवार्ड‘ पुरस्काराने डॉ. माहुलीकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रोटरी सेंट्रलमधुन प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार, प्रा. स्नेहलता परशुरामे, प्राजक्ता वैद्य, विलास देशमुख, लिना चौधरी, सुनिल कानडे, यांचा देखील पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन साधना दामले यांनी तर परिचय प्रा. स्नेहलता परशुरामे यांनी करुन दिला. कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष महेंद्र रायसोनी, विष्णू भंगाळे, डॉ. विलास महाजन, अनिल शिंपी, महेंद्र गांधी, राजेश चौधरी, संदिप मुथा, डॉ. विद्या चौधरी यांची उपस्थिती होती.