शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जळगावात चहा पिण्यापूर्वीच महिलेवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:37 PM

घर कोसळून करूण अंत : घरातील सदस्य बाहेर असल्याने बचावले

ठळक मुद्दे घरातील इतर तीन सदस्य बाहेर असल्याने बचावलेगेल्या 12 वर्षापासून मातीच्या घरात जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेला केले मृत घोषित

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 9 - सकाळी घरात चहा करीत असताना अचानक मातीचे घर कोसळून ढिगा:याखाली दाबल्या गेल्याने सुमित्राबाई अशोक पाटील (वय 52, रा. पिंप्राळा, जळगाव) या महिलेचा मृत्यू झाला. घरातच दुस:या खोलीत त्यांच्या सासू भिकूबाई ननसिंग पाटील (वय 75) यादेखील होत्या. मात्र त्यांना थोडा मार लागून त्या जखमी झाल्या. घरातील इतर तीन सदस्य बाहेर असल्याने ते बचावले. शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणारे अशोक ननसिंग पाटील व सुमित्राबाई पाटील हे पिंप्राळा गावातील कुंभारवाडा परिसरात गेल्या 12 वर्षापासून मातीच्या घरात राहतात. नेहमीप्रमाणे सुमित्राबाई बुधवारी सकाळी झोपेतून उठल्या व सकाळी साडेसहा वाजेदरम्यान चहा करीत होत्या. त्याच वेळी मातीचे धाब्याचे घर कोसळले व मातीच्या ढिगा:याखाली त्या दाबल्या गेल्या. याच वेळी त्यांच्या सासू दुस:या खोलीमध्ये पलंगावर झोपलेल्या होत्या. त्यांना यात किरकोळ इजा झाली. घरातील सुमित्राबाई यांचे पती अशोक पाटील,  मुलगी राजश्री (22) व भाचा गणेश सदाशिव पाटील हे घरा बाहेर दात घासत होते. त्यामुळे ते यातून बचावले. या वेळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन मातीच्या ढिगा:यातून महिलेला बाहेर काढले व खाजगी रुग्णालयात हलविले. तेथे मात्र या महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेत चहा पिण्यापूर्वीच या महिलेवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.