अमळनेर तालुक्यातील 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा

By Admin | Updated: April 20, 2017 12:19 IST2017-04-20T12:19:13+5:302017-04-20T12:19:13+5:30

अमळनेर तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून आणखी चार गावांना टँकर मंजूर झाले आहेत.

Tankers supply water to 10 villages in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा

अमळनेर तालुक्यातील 10 गावांना टँकरने पाणी पुरवठा

 अमळनेर,दि.20- तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून आणखी चार गावांना टँकर मंजूर झाले आहेत. टँकर सुरु असलेल्या गावांची संख्या 10 तर विहीर अधिग्रहीत गावांची संख्या 33 झाली असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.

सबगव्हाण, शिरसाळे, भरवस, लोणपंचम या गावांना टँकर मंजूर झाले असून यापूर्वी डांगर बु., वासरे, खेडीखर्दे, पिंपळे बु., धानोरा, देवगाव, देवळी या गावांना टँकर सुरु आहेत. तसेच सुंदरपट्टी, मंगरुळ, वावडे, इंदापिंप्री, सारबेटे या गावांचे टँकर प्रस्ताव आलेले आहेत. अमळनेर येथुन बंगाली विहीर, पांझरापोळ येथील विहीर तर भिलाली येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीवरुन टँकर भरले जातात. 
एकूण 33 गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर मालपूर येथील विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आलेला आहे. प्रत्यक्ष गावांची पाहणी करुन तात्काळ जिल्हाधिका:यांकडे प्रस्ताव पाठवले जातील. पांझरा नदीला पाणी आल्याने काठावरील गावांचा पाणी प्रश्न तूर्त सुटला आहे, असेही तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Tankers supply water to 10 villages in Amalner taluka