जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्र्धेत तामसवाडीच्या मुली अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:36 IST2019-09-01T21:36:46+5:302019-09-01T21:36:52+5:30

पारोळा : जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्र्धेत तामसवाडीच्या नागरिक शिक्षण मंडळाच्या हायस्कूलच्या मुलींच्या संघाची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी ...

Tamswadi's girls top in district-level shooting volleyball competition | जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्र्धेत तामसवाडीच्या मुली अव्वल

जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्र्धेत तामसवाडीच्या मुली अव्वल



पारोळा : जळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्र्धेत तामसवाडीच्या नागरिक शिक्षण मंडळाच्या हायस्कूलच्या मुलींच्या संघाची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघात निकिता वाणी, कोमल पवार, वैभव येवले, प्रतीक्षा अमृतकर, मानशी बेलदार, निकिता आखाडे, रूपाली सोनार, मयुरी पाटील, जयश्री सरदार, कल्याणी पाटील यांचा समावेश होता. त्यांना क्रीडा शिक्षक संदीप पवार, एन.जी.बाविस्कर यांचे मार्गदर्शन मिळाले. याबद्दल चेअरमन आमदार डॉ.सतीश पाटील, जि.प.सदस्य रोहन पाटील, ज्येष्ठ संचालक हिरामण पाटील, शूटिंग बॉल महाराष्ट्राचे सचिव ठाकरे, अशोक चौधरी, प्राचार्य ए.के.चव्हाण व विकासो चेअरमन प्रमोद पवार, पारोळा तालुका शूटिंंग बॉल सचिव संदीप पवार, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातून शूटिंग बॉलसाठी प्रथमच मुलींचा संघ विभागीय स्पर्धेत खेळणार आहे.

 

Web Title: Tamswadi's girls top in district-level shooting volleyball competition