तामसवाडी धरण १०० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:52+5:302021-09-06T04:21:52+5:30
धरणाची सध्याची पाणी पातळी रात्री साडेसात वाजता २६७.०२ मीटर वाढली असून जिवंत साठा १०० टक्के झाला ...

तामसवाडी धरण १०० टक्के भरले
धरणाची सध्याची पाणी पातळी रात्री साडेसात वाजता
२६७.०२ मीटर वाढली असून जिवंत साठा १०० टक्के झाला आहे.
बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणात पाणीसाठा वाढला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदीपात्रातील विसर्ग जास्त वाढण्याची शक्यता आहे.
बोरी धरणाच्या खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये. कृपया जीवित वा वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
बोरी मध्यम प्रकल्प, तामसवाडी, ता. पारोळा, जि. जळगाव
बोरी धरणाची सध्या रात्री ८.१० वा. धरणाचे ४ दरवाजे ०.२० व ३ दरवाजे ०.१५ मि.ने उघडून ४९६५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.