शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांनी तळपत्या उन्हात दारु दुकानासमोर ठोकला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:26 IST

जळगाव : दीड महिन्यानंतर दारु दुकाने सुरु करण्याचे आदेश झाल्यानंतर मंगळवारी तळीरामांनी दुकाने सुरु होण्याआधीच दुकानांसमोर तळ ठोकल्याचे चित्र ...

जळगाव : दीड महिन्यानंतर दारु दुकाने सुरु करण्याचे आदेश झाल्यानंतर मंगळवारी तळीरामांनी दुकाने सुरु होण्याआधीच दुकानांसमोर तळ ठोकल्याचे चित्र शहरात दिसून आले. भूक व तहान विसरुन दुकानांसमोर थांबून होते. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले तर काही ठिकाणी अक्षरश: फज्जा उडाला. दुपारुन भर उन्हात तळीरामांच्या रांगा लागल्या होत्या.लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. मात्र जिल्ह्यात मंगळवारपासून दारु दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली. त्यात सील बंद बाटलीतूनच मद्य विक्री करावी. दुकानावर पिण्यास मनाई, सोशल डिस्टन्सिंगंचे पालन, बॅरिकेटींग, सॅनिटायझरची फवारणी व ग्राहकांसाठी सॅनिटायझर अशा अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत.काही लाजले, काहींनी दुसऱ्याला केले उभेसमाजात आपले वेगळे स्थान आहे, त्यामुळे आपण दारु दुकानाच्या रांगेत थांबलो आणि कोणी पाहिले तर काय? या भीतीने अनेकांनी विशिष्ट रक्कम देऊन मजुरी करणाºया तसेच ओळखीच्या लोकांना रांगेत उभे केले होते तर काही जणांनी मालकांशीच संपर्क करुन बाटल्यांची आधीच बुकींग केली.सकाळी ९ वाजेपासून रांगा जिल्ह्यात मंगळवारपासून दारु दुकाने सुरु होणार असल्याने तळीरामांनी सकाळीच ९ वाजेपासून दारुच्या दुकानांच्या बाहेर तळ ठोकला होता. दुकाने सुरु व्हायला वेळ असला तरी आपल्यालाच लवकर मिळावी म्हणून तळीराम रांगेत होते. अनेक ठिकाणी शिस्त पाळण्यात आली तर काही ठिकाणी झुंबड उडाली होती.त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली.पहिला दिवस असल्याने दुकानांवर गोंधळ उडाला. त्यामुळे किती दारु विक्री झाली हे समजू शकले नाही.त्याची माहिती सादर करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव