शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:45 IST

आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी  विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले. 

जळगाव : अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून, तहसील कार्यालयात नेत असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने रस्ता अडवून ट्रॅक्टर पळविल्याची घटना सोमवारी  कानळदा रस्त्यावर घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा, तलाठी व शिपायाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी  विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले. 

धक्काबुक्की करत ट्रॅक्टरवरून ओढलेशिपाई इक्बाल शेख हे ट्रॅक्टरवर बसले व ट्रॅक्टर चालकाला तहसीलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, चालकाने तलाठी यांच्या वाहनाला ओव्हरटेक करीत ट्रॅक्टर लाकूडपेठच्या दिशेने पळवून नेला. तलाठी राहुल अहिरे व शासकीय वाहन चालक हे ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असतांना एक इसम त्यांच्या वाहनाला आडवा झाला. त्याने वाहनचालक मनोज कोळी यांच्यासोबत झटापट केली आणि ट्रॅक्टरवर बसलेल्या इक्बाल शेख यांना धक्काबुक्की करीत ट्रॅक्टवरुन खाली ओढीत ट्रॅक्टर पळवून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया