वरणगावात 300 रुपयांची लाच घेतांना तलाठी अटकेत
By Admin | Updated: May 25, 2017 12:53 IST2017-05-25T12:53:50+5:302017-05-25T12:53:50+5:30
एसीबीची कारवाई. सातबारा उता:यावर नाव लावण्यासाठी मागितले पैसे

वरणगावात 300 रुपयांची लाच घेतांना तलाठी अटकेत
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि.जळगाव,दि.25- सातबारा उता:यावर नाव लावण्यासाठी 300 रुपयांची लाच घेताना वरणगाव येथील तलाठी सुधाकर दगा नांद्रे (56) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विभागाने रंगेहाथ अटक केली़ गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरके व सहका:यांनी ही कारवाई केली़ तलाठी सुधाकर नांद्रे याला अटक केल्यानंतर एसीबीने चौकशी सुरु केली आहे. तर काही कर्मचा:यांनी त्याच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली आहे.