उपमहापौरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:15+5:302021-07-28T04:18:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याबाबत महापौर जयश्री महाजन व नगरसेवकांनी निषेध ...

उपमहापौरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री झालेल्या हल्ल्याबाबत महापौर जयश्री महाजन व नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच उपमहापौरांवर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महापौरांकडून करण्यात आली. याबाबत मंगळवारी महापौर जयश्री महाजन, शिवसेना-भाजप बंडखोर नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात उपमहापौरांवर झालेल्या हल्ल्यामुळे शहराची शांतता धोक्यात आली आहे. पिंप्राळा परिसर आणि संपूर्ण जळगाव शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे चिंतेचे वातावरण झाले असून हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. यावेळी नगरसेवक ॲड. दिलीप पाेकळे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, सुरेश सोनवणे, प्रतिभा देशमुख यांच्यासह इतर नगरसेवक देखील उपस्थित होते.