ग.स.ची निवडणूक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:47+5:302021-09-02T04:37:47+5:30
जळगाव - जिल्ह्यातील ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपून आता वर्ष झाले आहे. आधी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे ही निवडणूक रखडली होती. ...

ग.स.ची निवडणूक घ्या
जळगाव - जिल्ह्यातील ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपून आता वर्ष झाले आहे. आधी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे ही निवडणूक रखडली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, राज्य शासनने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर लावण्यात आलेली स्थगितीची मुदत देखील आता संपली असल्याने ग.स.सोसायटीची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी ग.स.च्या सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांनी केली आहे. याबाबत सहकार गटाच्या सर्वच संचालकांनी याबाबत राज्य शासनाला निवेदन दिले आहे.
दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस
जळगाव - शहर व परिसरात बुधवारी देखील दमदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळपासून कडक ऊन होते. मात्र, सायंकाळी ५ वाजेनंतर ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्यामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, आगामी काही दिवस तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
कानळदा रस्त्याची दुरुस्ती
जळगाव - शहरातील कानळदा रस्त्यालगत असलेल्या केसी पार्कजवळ २२ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रश्न मांडून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर अखेर बांधकाम विभागाकडून या रस्त्याचा ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्याचा कामाला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत बांधकाम विभागाला सूचना दिल्या होत्या.