स्वस्त धान्य दुकानांचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:37+5:302020-12-04T04:45:37+5:30
जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील २२ स्वस्त धान्य दुकानांमधील हजारो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ...

स्वस्त धान्य दुकानांचा लाभ द्या
जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील २२ स्वस्त धान्य दुकानांमधील हजारो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याला जिल्हा पुरवठा विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप मुक्ताईनगरचे अमोल सतीश वैद्य यांनी केला आहे. तसेच लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील सुरु केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, ‘या महिन्यांमध्ये धान्य वितरीत न झाल्याने हे धान्य खराब होण्याच्या मार्गावर आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकार त्याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप केला आहे.