शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

वृद्धेच्या मृत्यूनंतर महिन्याने यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:54 AM

तीन गेटवर तीन सुरक्षा रक्षक : आत-बाहेर जाणाऱ्यांवर वॉच, आणखी उपाययोजना सुरु

जळगाव : कोविड रुग्णालयात मालती नेहते या महिलेचा शौचालयात मृतदेह आढळून आल्याच्या घटनेला १० रोजी महिना होत आहे़ महिनाभराच्या कालावधी प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या, सुरक्षा यंत्रणेचे पुन्हा काही घटनांवरून वाभाडे निघाले, मात्र, महिनाभराच्या कालावधीने अखेर यंत्रणा अलर्ट झाली असून आता प्रत्येक आत -बाहेर ये-जा करण्याऱ्यांवर सुरक्षा रक्षकात तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवला जात आहे़ स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले असून त्यावरही विशेष नियंत्रण आहे़डीन कार्यालयाकडून कक्ष एक कडे जाण्याच्या मार्गात गेट बसविण्यात आले आहे़ या गेटवर एक सुरक्षा रक्षक तैनात आहे़ शिवाय मुख्य प्रवेशद्वारावर दोन त्यानंतर रुग्णालयात आत जाण्यासाठीचे गेट सुरक्षा रक्षक बंदच करून ठेवत असतात़ यानंतर कक्ष ७ कडे जाताना दोन सुरक्षा रक्षक कायम बसलेले असतात़ आता कक्षात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. शिवाय १२ स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले होते़ ते बसविण्यात आले आहेत़वृद्ध सापडला पाचोºयात... जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच भेटीच्या दिवशी नगरदेवळा येथील एक संशयित वृद्ध रुग्णालयातून निघून गेल्याचा प्रकार समोर आला होता़ ही घटना लक्षात येताच सर्व कर्मचाºयांनी आधी सर्व स्वच्छतागृहे व वॉर्ड तपासले होते़ अखेर सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा रुग्ण बाहेर गेल्याचे दिसले होते व दुसºया दिवशी हा रुग्ण पाचोरा येथे आढळून आला होता़ तेव्हाही सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले होते़स्वच्छता निरीक्षकही आले... आठ दिवस महिलेचा मृतदेह रुग्णालयात पडूनही तो सापडला नव्हता, दुर्गंधी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यावेळी स्वच्छता निरीक्षक हे पदच रिक्त असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत नियंत्रणच नव्हते मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी या पदावर सुरेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियंत्रणाखाली ही स्वच्छतेची कामे नियमित होत असल्याचे सांगितले जात आहे़ महापालिकेडून त्यांची नियुक्ती झाल्याची माहिती आहे़जिल्हाधिकाºयांच्या तंबीनंतर बदल- महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर अनेक बदल झाले, मात्र, स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्था सतर्क नसल्याचे चित्र वारंवार समोर आले होते़ रुग्णांना जागेवरच सुविधा मिळण्यास अडचणी होत होत्या़ मात्र, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी थेट सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द करण्महिनाभरातकाय बदलले?1) जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक2) सर्व कक्षांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वयीत झाले3) महिनाभरानंतर बेड साईड असिस्टंट नियुक्त झाले4) सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र5) जिल्हाधिकाºयांच्या वारंवार पाहणीमुळे यंत्रणा सतर्क6) तीन नवीन गेट, प्रत्येक गेटवर एक सुरक्षा रक्षक7) प्रत्येक रुग्णाला ओळख पटावी म्हणून ड्रेसकोड लागू.8) १२ स्वच्छतागृहांचे तुटलेले दरवाजे बसविण्यात आले आहेत. याचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून ही यंत्रणा अधिक सतर्क असल्याचे चित्र आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव