धुळ्यात ‘स्वाइन फ्लू’ने वृद्धाचा मृत्यू

By Admin | Updated: October 9, 2015 00:18 IST2015-10-09T00:18:16+5:302015-10-09T00:18:16+5:30

धुळे : स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गोकूळ भाऊसिंग राठोड या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.

Swine flu deaths in Dhule | धुळ्यात ‘स्वाइन फ्लू’ने वृद्धाचा मृत्यू

धुळ्यात ‘स्वाइन फ्लू’ने वृद्धाचा मृत्यू

धुळे : स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गोकूळ भाऊसिंग राठोड (वय 65) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेला 8 दिवसांचा कालावधी उलटूनदेखील जिल्हा रुग्णालय व महापालिका आरोग्य विभाग या घटनेविषयी अनभिज्ञ आहे.

गोकूळ राठोड नंदुरबारला मुलाकडेच राहत होते. 30 सप्टेंबरला अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी धुळ्याला आणले होते. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिका:यांनी राठोड यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्याने राठोड यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्याठिकाणी 1 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात अहवाल पाहिल्यावर त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. राठोड यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

स्वाइन फ्लू कक्षात तालुक्यातील सौंदाणे येथील वैशाली लोटन पाटील (28) ही महिला दाखल आहे. तिच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

Web Title: Swine flu deaths in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.