शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

प्रसन्नता आणि तंदुरुस्तीसाठी ‘स्विमिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:24 IST

आरोग्य : थंडीची चाहूल लागल्याने जलतरण तलावांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत गर्दी

जळगाव : धावपळीच्या जीवनात आणि त्यात कामाच्या ताणतणावाचा शरीरावर नकळत परिणाम होत असतो. किरकोळ व्याधी वाढत असतात. काम करण्याची इच्छा होत नाही. या सर्वांवर जर मात करायची असेल तर दररोज पोहायला जा. अत्यंत सोपा आाणि शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल करणारा हा व्यायाम आहे. दिवसभर प्रसन्न राहण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने ‘स्विमिंग’ करा. असा सल्ला गेल्या ३० ते ४० वर्षांपासून बाराही महिने स्विमिंगला जाणाऱ्या नागरिकांतर्फे देण्यात येत आहे.गेल्या आठवडाभरापासून शहर आणि परिसरात थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावांमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे.मेहरुण येथील कोळीळ गुरुजी जलतरण तलाव, जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, एकलव्य क्रीडा मैदानावरील जलतरण तलाव, गणेश कॉलनीतील गीताशंकर जलतरण तलाव व पोलीस लाईनमधील जलतरण या ठिकाणी पहाटे साडेपाच पासूनच पोहण्यासाठी नागरिक येत आहेत. शारिरीक स्वास्थासाठी हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जात असल्याने, आपल्या पालकांसोबत बच्चे कंपनीदेखील विविध जलतरण तलावांत पोहतांना दिसून आली.विशेष म्हणजे एकलव्य जलतरण तलाव, कोकीळ गुरुजी जलतरण तलाव या ठिकाणी ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलासांठी स्वतंत्र पोहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे लहान मुलेही याचा लाभ घेताना दिसून येत आहे.४पोहण्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते, थकवा जाणवत नाही. विशेष म्हणजे कामाच्या व्यापांमुळे मानसिक तणाव येत नाही.४पोहण्यामुळे शरिराच्या सर्व मांसपेशी व अवयवांची हालचाल होते.यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.४ज्या लोकांना कंबरदुखी, पाठदुखीव गुडघेदुखीचा त्रास आहे, अशांना पोहण्यामुळे या आजारांपासून आराम मिळतो. उतारपण असले तरी, थकवा जाणवत नाही.४कुठल्याही ऋतूत सर्दी, पडसे , खोकला हे किरकोळ आजारदेखील होत नाही. पोहण्यामुळे शरिर चपळ होऊन, रोगप्रतिकारक शक्ती वाढते.४शरिराची त्वचा तेज होते, तसेच वजनही लवकर कमी होते.४ज्या व्यक्ती संधिवाताच्या दुखण्यामुळे व्यायाम करु शकत नाहीत, अशा व्यक्तींना पोहणे हा व्यायाम फायदेशिर ठरतो. 

टॅग्स :SwimmingपोहणेJalgaonजळगाव