पाचोरा लसीकरण केंद्रावर झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST2021-07-04T04:12:30+5:302021-07-04T04:12:30+5:30

केंद्रावर सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी केली. लस देणारी एकच नर्स असून, एक नोंदणी करणारा कंत्राटी ...

Sweep at Pachora Vaccination Center | पाचोरा लसीकरण केंद्रावर झुंबड

पाचोरा लसीकरण केंद्रावर झुंबड

केंद्रावर सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी केली. लस देणारी एकच नर्स असून, एक नोंदणी करणारा कंत्राटी कर्मचारी केंद्रावर नेमण्यात आला आहे. यामुळे एकाच नर्सवर कामाचा ताण पडल्याने, गर्दी आवरणे मुश्कील होत आहे. नागरिकांना तासंतास ताटकळत उभे राहावे लागत असून, लोक वैतागत आहेत. या केंद्रावर कोणत्याही प्रकारे नियोजन नसून, संबंधित यंत्रणाही दुर्लक्ष करून कामचुकारपणा करीत आहेत.

लसीकरणाचे गांभीर्य नसल्याचे केंद्रावर पाहणी केल्यावर दिसून आले. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांचेशी संपर्क केला असता, लसीकरणाच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करायला नको. मात्र, लस आल्याचे कळताच एकच गर्दी उसळते. आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगितले. दरम्यान, लस किती डोस उपलब्ध झाले, तेवढ्याच नागरिकांना रांगेत बुकिंग करून लस द्यावी, वेळ ठरवून द्यावी, सुरक्षित अंतर ठेवावे आदी मागण्या उपस्थितांनी केल्या.

030721\03jal_1_03072021_12.jpg

पाचोरा लसीकरण केंद्रावर झुंबड

Web Title: Sweep at Pachora Vaccination Center