स्वामी समर्थ केंद्रातर्फे सर्व शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:50+5:302021-09-06T04:19:50+5:30
धरणगाव : येथील दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राच्य वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शहरातील सर्व शाळांमधील जवळपास ७० शिक्षकांचा सन्मान सोहळा ...

स्वामी समर्थ केंद्रातर्फे सर्व शिक्षकांचा सन्मान
धरणगाव : येथील दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राच्य वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त शहरातील सर्व शाळांमधील जवळपास ७० शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला.
या सोहळ्याला साहाय्यक कर आयुक्त विशाल मकवाने, भाजप गटनेते कैलास माळी, पत्रकार व कीर्तनकार आर.डी. महाजन, प्रा. कविता महाजन, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर माळी, उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जैनुद्दीन शेख, विद्या बोरले, ज्योती जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन वसंत पाटील यांनी केले. प्रास्ताविक राकेश मकवाने यांनी केले. याप्रसंगी केंद्राच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या संस्कार वर्गात शिक्षण देणाऱ्या प्रवीण बडगुजर, चंदा पवार, प्रदीप झुंजारराव यांचा सन्मान झाला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी आर.पी. पाटील, बिपिन भाटिया, जगदीश शिंदे, श्याम अहिरे, राजू चौधरी, गौरव वाणी, राहुल महाजन, बबलू चौधरी, कार्तिक मोरे, हर्षल पाटील, चेतन पाटील, नीलेश पाटील, कुणाल ठाकरे, प्रतीक वाणी, दुर्गेश राठोड, रोहित भदाणे, भाईजी किंमत, सुलोचना मकवाने, रूपाली मकवाने, मंगला महाजन, सुनंदा पाटील, मनीषा पाटील, अमिता भाटिया, अनिता झांबरे, ममता भाटिया, माया शिंदे यांनी मेहनत घेतली.
050921\img_20210905_133342.jpg~050921\05jal_6_05092021_12.jpg
फोटो कॅप्शन: स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सन्मानित झालेले धरणगावातील सर्व शिक्षक व शिक्षिका सोबत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी.
छाया :आर. डी. महाजन.~स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सन्मानित झालेले धरणगावातील सर्व शिक्षक व शिक्षिकासोबत मान्यवर. (छाया : आर. डी. महाजन)