मास्टर कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST2021-03-04T04:30:11+5:302021-03-04T04:30:11+5:30
मास्टर कॉलनीत हनीम रज्जाक पटेल हे पत्नी मुन्नी, मुलगा असलम यांच्यासोबत वास्तव्यास होते. हनीफ पटेल हे मिस्तरी काम करतात. ...

मास्टर कॉलनीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू
मास्टर कॉलनीत हनीम रज्जाक पटेल हे पत्नी मुन्नी, मुलगा असलम यांच्यासोबत वास्तव्यास होते. हनीफ पटेल हे मिस्तरी काम करतात. मुलगा असलम एमआयडीसीत मामाच्या कंपनीत कामाला होता. बुधवारी वडील हनीफ कामावर गेले होते. सकाळी १० वाजाता आईसोबत असलम याने जेवण केले. यानंतर आई घरी आलेल्या बहिणीसोबत दवाखान्यात निघून गेल्या. असलम व दोन्ही मुली घरी होते. जेवणानंतर बाहेर पडलेला असलम १२ वाजेच्या सुमारास घरी परतला. यानंतर जमिनीवर कोसळला. असलम हा पडला असल्याची माहिती मावसभाऊ मो. आरीफ शरीफ पटेल यांना कळविण्यात आली. आरीफ यांनी असलम यास जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, असलम याच्या डाव्या डोळ्याजवळ, छातीवर मारहाणीचे व्रण आहेत. तर त्याचा गळा दाबल्याचेही दिसून येत असल्याचा दावा असलम यांचा मावसभाऊ आरिफ पटेल याने केला.
पोलिसांकडून घटनास्थळाची चौकशी
दरम्यान, रामेश्वर कॉलनी परिसरात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा खून झाल्याची अफवा पसरल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गोविंदा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मात्र मारहाण झाल्याचा काहीच प्रकार घडला नसल्याने स्पष्ट झाले. असलम पटेल याचा घरात पडूनच मृत्यू झाला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. नेमका त्याचा मृत्यू कसा झाला, याचे नेमके कारण शवविच्छेदनात समोर येणार आहे.