शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणासोबत गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 16:54 IST

गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसºया दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी विशाल अशोक भोई (२४, रा.रामेश्वर कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमेहरुण तलावात आढळला मृतदेह  अपहरणाचा गुन्हा दाखल

जळगाव : गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसºया दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद असल्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी विशाल अशोक भोई (२४, रा.रामेश्वर कॉलनी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाला नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथे काम करीत असताना नाथानी यांच्या घरासमोरच राहणाºया एका कुटुंबाने आजच्या दिवस धुणी भांडी करण्यासाठी तरुणीच्या आईला बोलावले. त्यामुळे आई तिकडे गेली. तेथील काम आटोपून परत नाथानी यांच्याकडे दुपारी दोन वाजता आली असता नाथानी यांची वहिणी नाशा नीलेश नाथानी यांनी मुलगी १२.३० वाजताच काहीही न सांगता काम अपूर्ण सोडून गेल्याच माहिती दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध करुनही तरुणीची माहिती मिळाली नाही. त्यामुळे सायंकाळी ७.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

हाताला ओढणी बांधलेलीएकीकडे मुलीचा शोध सुरु असतानाच दुसरीकडे सोमवारी सकाळी सात वाजता जे.के.पार्कला लागून असलेल्या मेहरुण तलावात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका हाताला ओढणी होती. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे तरुणीच्या आई, वडीलांसह नातेवाईकांनी धाव घेतली. मुलीचा मृत्यूप्रकरणात त्यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी करुन तरुणीच्याबाबतीत संशय व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव