जळगावात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: April 16, 2017 17:44 IST2017-04-16T17:44:11+5:302017-04-16T17:44:11+5:30

लगAाला झाले होते 28 दिवस. सासरच्यांवर कारवाईसाठी माहेरच्यांचा संताप

Suspicious death of newlyweds in Jalgaon | जळगावात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

जळगावात नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

 जळगाव,दि.16-चार दिवसापूर्वीच मान करुन मुळ लावून सासरी पाठविलेल्या आशाबाई सुनील कोळी (वय 22 रा.हिंगोणा, ता.धरणगाव) या नवविवाहितेचा रविवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. दरम्यान, सासरच्यांनी तिच्या तोंडावर उशी दाबून हत्या केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याच्या मागणीसाठी माहेरच्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात संताप व्यक्त केला. दरम्यान, या घटनेप्रकरणी पती, सासरा, भाऊ व अन्य एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

भोलाणे, ता.जळगाव येथील माहेर असलेल्या आशाबाई हिचा विवाह गेल्या महिन्यात 18 मार्च रोजी हिंगोणा येथे सुनील कोळी याच्याशी झाला. लगAानंतर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर आशाबाई पुन्हा माहेरी आली होती. परंपरेप्रमाणे गुरुवारी 13 मार्च रोजी भांडीकुंडी, लाडू यासह अन्य वस्तू मुळ लावून आशाला सासरी पाठविण्यात आले होते.

Web Title: Suspicious death of newlyweds in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.