लोंढ्री तांड्यात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:00+5:302021-09-04T04:21:00+5:30
पहूर, ता. जामनेर : लोंढ्री, ता जामनेर येथील तांड्यात दोन दिवसीय स्त्री जातीच्या अर्भकाचा संशयास्पद मृत्यू ...

लोंढ्री तांड्यात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू
पहूर, ता. जामनेर : लोंढ्री, ता जामनेर येथील तांड्यात दोन दिवसीय स्त्री जातीच्या अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोंढ्री तांड्यातील एक महिलेने स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. पाळधीतील एका खासगी दवाखान्यात तिची २५ ऑगस्ट रोजी प्रसूती झाली होती. बाळ व संबंधित महिलेची तब्येत चांगली होती. २७ ऑगस्ट रोजी अर्भकाचा अचानक मृत्यू झाला. घटनेची वाच्यता कोठेही झाली नाही. पण एक ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला याची माहिती मिळाली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी लोंढ्री तांडा येथे जाऊन पाहणी व माहिती जाणून घेतली आहे. यासंदर्भात पुढील चौकशी करण्यासाठी पहूर पोलीस स्टेशनला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शुक्रवारी तक्रार पत्र दिले आहे. अर्भकाचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झालेले नाही. अचानक झालेल्या मृत्यूने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात पुढील चौकशी पोलीस करीत असल्याने त्यांच्या स्तरावरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी सांगितले आहे.
प्रतिक्रिया
याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिली आहे. याची सखोल चौकशी करून वैद्यकीय अहवालानुसार मृत्यूचे कारण निष्पन्न होईल.
एस. पी. बनसोड
पोलीस उपनिरीक्षक
पहूर पोलीस स्टेशन