शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जळगावात कारागृहातील कैदी पलायनप्रकरणी दोन कर्मचारी निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:37 IST

उपमहानिरीक्षकांची कारवाई

ठळक मुद्देकारागृहाच्या भींतीची उंची वाढविणारहलगर्जीपणा खपवून घेणार नाही

जळगाव : येथील कारागृहातून दोन कैदी पसार झाल्याने भिशी अमलदार बाळू उत्तम बोरसे व रात्री पाळीचे अमलदार वासुदेव हिरामण सोनवणे या दोघांना कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबन काळात बोरसे याचे मुख्यालय नाशिक तर सोनवणे याचे जालना देण्यात आले आहे.दरम्यान, आरोपींनी पलायन केल्याने या कारागृहाची लवकरच उंची वाढविण्यात येईल व सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यिात येणार असल्याचे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.प्राथमिक चौकशीत भिशी अमलदार बाळू बोरसे व सोनवणे दोषी आहेत. या प्रकरणाची दक्षता पथकामार्फत विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. आणखी जो दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.शेषराव सुभाष सोनवणे (वय २८, रा. बिलवाडी, ता. जामनेर) व रवींद्र भिमा मोरे (वय २९, रा. बोदवड) या दोन्ही कैद्यांना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास स्वयंपाकाच्या कामासाठी बराकमधून बाहेर काढण्यात आले होते. कारागृह रक्षकाची नजर चुकवून हे दोघेही पसार झाले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी उपमहानिरीक्षक योगेश देसाई हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात आले होते. चौकशीनंतर त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.दोन वर्षांच्या कालावधीत दोन वेळा आरोपी पलायनाच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता कारागृहाच्या भींतीची उंची वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाशी चर्चा करुन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. कारागृहात काही उपायोजना करण्याच्याही सूचना देसाई यांनी दिल्या.हलगर्जीपणा खपवून घेणार नाहीबाळू बोरसे यांच्यावर ११ कैद्यांची जबाबदारी असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. देसाई यांनी कारागृहातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांचे जबाब नोंदवून घेतले. दक्षता पथकाने चौकशी करताना कारागृहातील इतर आरोपींना या प्रकाराची माहिती होती का?, कारागृह प्रशासन कुठे कमी पडले याचीही माहिती जाणून घेतली. दक्षता पथकाकडून चौकशी अहवाल महानिरीक्षकांना सादर केला जाणार आहे.अंतर्गत गटबाजीची घेतली दखलकारागृहात अधिकारी व कर्मचाºयांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचा मुद्दा छेडला असता, देसाई म्हणाले या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली आहे. त्याचे परिणाम येत्या काही दिवसातच दिसून येतील. या गटबाजीचा परिणाम आरोपींवर देखील होत आहे. अनेक अधिकाºयांच्या तक्रारी आहेत. त्याचे पुरावे देखील आपल्याकडे आलेले आहेत, असेही देसाई यांनी मान्य केले. दुपारपर्यंत चौकशी करुन देसाई औरंगाबाद येथे रवाना झाले.दोन पथके रवानाकारागृहातून दोन आरोपी पलायन झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांचे दोन स्वतंत्र पथके रवाना झाली आहेत. गुरुवारी अमळनेर पोलिसांच्या तावडीतूनही गुन्हेगाराने पलायन केल्याने त्याच्याही शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले.अधीक्षकासह इतर पदे वाढविण्यावर भरकारागृह अधीक्षक डी.टी. डाबेराव यांच्या निलंबनानंतर कारागृहाचे अधीक्षक पद रिक्त आहे. प्रभारीवरच कामकाज केले जात आहे. त्यामुळे आता सर्वात आधी अधीक्षकाचे पद भरले जाणार असून शिपाई संवर्गातील पदे वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. जळगाव कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची आहे. परंतु, सद्यस्थितीत येथे ४५० कैदी आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किमान ८० शिपाई हवेत, प्रत्यक्षात आज ४० रक्षक कार्यरत आहेत. त्यांच्यावर प्रचंड भार येत आहे, असेही योगेश देसाई म्हणाले. औरंगाबाद विभागात १४ कारागृह आहेत. नवीन शंभर पदे भरुन त्यांचे नियोजन करुन कर्मचारी वाटप केले जाणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगJalgaonजळगाव