विद्यार्थिनींचा छळ करणारा कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: January 11, 2017 04:22 IST2017-01-11T04:22:06+5:302017-01-11T04:22:06+5:30
आॅर्डनन्स फॅक्टरी येथील केंद्रीय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनींचा तेथील कर्मचाऱ्याकडून छळ केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

विद्यार्थिनींचा छळ करणारा कर्मचारी निलंबित
वरणगाव, जि. जळगाव : आॅर्डनन्स फॅक्टरी येथील केंद्रीय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनींचा तेथील कर्मचाऱ्याकडून छळ केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरीतील केंद्रीय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींचा सफाई कर्मचारी सुरेश भोलाराम छबरीबन ह. मु. कर्मचारी वसाहत वरणगाव याने सतत छळ चालवला होता. विद्यार्थिनींनी वर्ग शिक्षिकेसह प्राचार्यांकडे याची तक्रार दिली. त्यानंतर संतप्त पालकांनीही तत्काळ कारवाईची मागणी केली होती. याबाबत विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे पुन्हा तक्रार केली असता संबंधिताला तत्काळ निलंबत करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)