भुसावळचे निलंबित तलाठी नरेंद्र ठाकूर सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 14:27 IST2019-06-14T14:27:25+5:302019-06-14T14:27:29+5:30
गैरव्यवहारांच्या आरोपामुळे कारवाई

भुसावळचे निलंबित तलाठी नरेंद्र ठाकूर सेवेतून बडतर्फ
वरणगाव/भुसावळ : भुसावळ शहराचे व सध्या निलंबित असलेले तलाठी नरेंद्र राजेंद्र ठाकूर यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश भुसावळचे उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिले आहेत. भुसावळ शहर व सातारे गाव या दोन्ही सजांमध्ये तलाठी म्हणून काम केलेले ठाकूर यांना गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, सखोल चौकशीनंतर चिंचकर यांनी त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश १२ जून रोजी दिले आहेत. याची प्रत नरेंद्र ठाकूर यांना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.