आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १ : प्रेम प्रकरणातून पळवून नेलेल्या मुलीचा खून केल्याचा संशय असून पालकांच्या तक्रारीनुसार न्यायालयाने या प्रकरणात १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी गुरुवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी मुलगी हरविल्याची तसेच अपहरणाचीही तक्रार दाखल आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसीम शेख अहमद (रा.दंगलग्रस्त कॉलनी, जळगाव) याने ७ जून २०१७ रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका २१ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. मुलगी घरातून गायब झाल्यानंतर तिच्या वडीलांनी त्याच दिवशी रामानंद नगर पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा काही दिवसांची अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस चौकशीसाठी भिवंडी येथे गेले होते. तेव्हा मुलीने पालकांकडे येण्यास नकार दिला होता.सहा महिन्यापासून मुलगी गायबपालकाची माया म्हणून कुटुंबातील काही सदस्य मुलीला भेटण्यासाठी गेले असता ती मुलासोबत दिसून आली नाही. वारंवार चौकशी केल्यानंतरही मुलगा तिची माहिती सांगत नाही किंवा तिला समोर आणत नाही. त्यामुळे मुलीचा खून झाल्याचा संशय पालकांना आहे. त्यांनी याबाबत रामानंद नगर व जिल्हा पेठ पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पालकाने न्यायालयात धाव घेतली.पालकांनी हे प्रकरण न्यायालयात नेल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने १५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची प्रत घेऊन स्वत: पालक रामानंद नगर पोलिसांकडे गेले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांना विचारले असता न्यायालयाचे आदेश मिळाले आहेत, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात यापूर्वीही पोलिसांनी चौकशी केली होती, परंतु मुलीने पालकांकडे जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. कायद्याने मुलगी सज्ञान असल्याने तिचा ताबा घेता आला नाही, असेही रोहोम यांनी सांगितले.
जळगावातून पळवून नेलेल्या मुलीचा खून केल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:32 IST
न्यायालयाच्या आदेशानंतर रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
जळगावातून पळवून नेलेल्या मुलीचा खून केल्याचा संशय
ठळक मुद्देसहा महिन्यापासून मुलगी गायबपालकांनी मुंबईला जाऊन केली चौकशीन्यायालयाच्या आदेशानुसार रामानंद नगर पोलिसात गुन्हा