शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेला पळविणारा संशयित वॉटेंड घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:33 IST

बक्षीस जाहीर : बालिका पालकांच्या स्वाधीन

जळगाव : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने पळविलेल्या १३ वर्षाच्या मुलीला पळविणाºया गणेश सखाराम बांगर (३२, रा.मालेगाव, जि.वाशिम) याला जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी वॉटेंड जाहीर केले असून त्याच्याबाबत माहिती देणाºयास योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, गणेश याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक विदर्भात रवाना झाले आहे.मुलगी व संशयिताच्या शोधार्थ नशिराबाद पोलिसांचे पथक अमरावती जिल्ह्यात गेले होते. लोणी पोलीस स्टेशन येथून मुलीला घेऊन हे पथक मध्यरात्री नशिराबादला दाखल झाले. या मुलीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. लोणी येथे जाताना पोलिसांनी फियार्दी तथा मुलीच्या भावाला सोबत नेले होते. या बहीण-भावांची पहिली भेट तेथे झाली. त्यानंतर मध्यरात्री आई, वडिलांची भेट झाली. मुलीला पाहताच आई ढसाढसा रडली, तर घाबरलेल्या मुलीनेही आईला मिठी मारली.दुचाकीही चोरीचीच़़गणेश याच्याजवळ असलेली दुचाकी (क्र.एम.एच.३७ वाय १८४७) चोरीची असून त्यावर लाल अक्षरात इंग्रजीत प्रेस असे नाव लिहिलेले आहे. सध्याच्या लॉकडाउनमध्ये मजुरांचे स्थलांतर सुरू असल्याने त्याचा फायदा घेऊन रस्त्याने चालणाºया मजुरांशी गोड बोलून गावात सोडण्याचा तसेच मदत करण्याचा बहाणा करून महिला व मुलींना दुचाकीवर बसवून पळवून नेत आहे. या तीन दिवसात नशिराबाद व मूर्तीजापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याशिवाय हॉटेल, ढाबा चालविण्यास घेतो, नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तो लोकांची फसवणूक करतो.अंगठ्यावर ‘माँ’...पंज्यावर ‘आई’गणेश याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर ‘माँ’ असे हिंदीत तर पंजावर ‘आई’ असे लिहिले आहे. डाव्या हाताच्या मानेवर इंग्रजीत ‘साथिया’ असे लिहिले आहे. टिकटॉक व यूट्युब अ‍ॅपवर व्हिडिओ तयार करण्याचा त्याला छंद आहे. त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ (मो :९४०४८०७२०७), स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (मो.९८२३०१९७११) व सहायक पोलीस निरीक्षक, नशिराबाद (मो.९६८९९०३५८८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले आहे. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यासह योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव