शिरसोली शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 16:01 IST2017-07-04T16:01:37+5:302017-07-04T16:01:37+5:30

पोलिसांनी घेतले महिलेच्या पतीसह तिघांना ताब्यात

Suspected death of a woman in Shirasoli Shivar | शिरसोली शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू

शिरसोली शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू

 ऑनलाईन लोकमत

जळगाव/शिरसोली, दि.4- तालुक्यातील शिरसोली गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बंधा:यात मंगळवारी सकाळी आठ वाजता ममता राजू बारेला (वय 30 मुळ रा.देवगड-देव्हारी, ता.चोपडा ह.मु.शिरसोली शिवार, ता.जळगाव) या महिलेचा संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आला. मृत्यूबाबत संशय असल्याने पोलिसांनी पती राजू मालसिंग बारेला, विनोद पुना भील व भगवान भील (सर्व रा.शिरसोली) या तिघांना ताब्यात घेतले आहे. 
मंगळवारी सकाळी शिरसोली येथील रहिवासी राजाराम शिवराम पाटील हे शेतात जात असताना त्यांच्या शेताला लागून असलेल्या बंधा:यात ममता बारेला हिचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही घटना पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी व शरद पाटील यांना कळविली. दोघांनी घटनास्थळी येत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांना माहिती दिली. सहायक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील, उपनिरीक्षक रोहन खंडागळे, कविता भुजबळ व बाळकृष्ण पाटील यांनी घटनास्थळाची व मयताच्या घराची पाहणी केली.
रात्री दोन जणांनी नेले होते बाहेर
विनोद भील व भगवान भील हे दोघं जण रात्री साडे आठ वाजता ममताच्या घरी गेले होते. तेथे तिला विनोदने 40 रुपये दिले. त्यानंतर दुचाकीवर बसवून तिला लांब घेवून गेले. रात्री ती परत आलीच नाही. सकाळी साडे आठ वाजता मृतदेहच आढळून आला.एमआयडीसी पोलिसांनी या घटनेनंतर महिलेच्या पतीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Suspected death of a woman in Shirasoli Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.