चोर सोडून संन्याशावर संशय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:27 IST2020-02-10T16:27:30+5:302020-02-10T16:27:50+5:30
कळमाडू परिसरात मुलांच्या अपहरणाची अफवा : पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

चोर सोडून संन्याशावर संशय...
कळमडू, ता. चाळीसगाव येथून जवळ असलेल्या पोहोरा येथे अज्ञातांनी दोन मुलांचे अपहरण करून घेऊन जात असताना त्याना दहिवद येथे पकडल्याची अफवा गावात वाऱ्यासारखी पसरल्याने सोमवारी १० रोजी गावाबाहेर शेकडो ग्रामस्थ जमा झाले होते. त्यातच गावात भिक्षुक साधू फिरत असल्याने त्यांना काही तरूणांनी घेराव घातला होता. मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ९ ते १० साधूंना काही काळ ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आले.
पोहोरा येथे आलेल्या दोन साधूंनी दोन मुलांचे अपहरण केल्याची व कळमडू येथूनही मुलाचे अपहरण झाल्याची अफवा गावात सोमवारी वाºयासारखी पसरली. प्रत्येक पालक व महिला आपल्या मुलांचा शोध घेत ग्रामपंचायत कार्यालयात आल्याने एकच गर्दी झाली होती.
त्यातच गावात भिक्षुक साधू फिरत असल्याने त्यांच्यावर संशय घेत त्यांना घेराव घालत जमावाने प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. मात्र काही सुज्ञ तरूणांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात फिरणाºया त्या १० साधूंना ग्रामपंचायत कार्यालयात बंद खोली बसवून ठेवले. त्यामुळे विनाकारण केवळ संशयातून ग्रामस्थांचा रोष ओढवण्यापासून साधूंची सुटका झाली.
असाच प्रकार दहिवद येथेही घडला. अपहरणाची अफवा पसरल्याने तेथे गावात फिरणाºया दोन साधूंना सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बसवून ठेवले .
या घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. सचिन बेद्रे , पोलिस उनिरीक्षक हेमंत शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
चौकट
पोहोरा, कळमडू व दहिवद येथे मुलांच्या अपहरणाचा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. साधूंच्या वेशातील व्यक्तींनी मुलांचे अपहरण केल्याची अफवा पसरवली जात आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरविणाºया व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
- सचिन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक, मेहुणबारे