चाळीसगावच्या सुशील अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST2021-05-29T04:13:46+5:302021-05-29T04:13:46+5:30

चाळीसगाव, जि. जळगाव : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान राष्ट्रीय समितीच्या सहअध्यक्षपदी चाळीसगाव येथील सुशील नारायणदास ...

Sushil Agarwal of Chalisgaon | चाळीसगावच्या सुशील अग्रवाल

चाळीसगावच्या सुशील अग्रवाल

चाळीसगाव, जि. जळगाव : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान राष्ट्रीय समितीच्या सहअध्यक्षपदी चाळीसगाव येथील सुशील नारायणदास अग्रवाल यांची शुक्रवारी निवड करण्यात आली.

ही निवड एक वर्षासाठी असेल. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही १९४१ मध्ये स्थापन झालेली बांधकाम उद्योगाची शिखर संस्था आहे. २०,००० बांधकाम कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत. देशभरात संस्थेच्या १८० शाखा आहेत. बीएआय बांधकाम उद्योग व सरकार यांच्यामध्ये धोरणात्मक बाबींमधील दुवा म्हणून ही संस्था काम करते आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावते.

सुशील अग्रवाल यांनी वर्षभरात देशभरात चांगले कार्य केल्याने त्यांची फेरनिवड झाली आहे. सुशील अग्रवाल यांना नुकताच वर्ष २०२०-२१ साठीचा रोटरी इंटरनॅशनल प्रांत ३०३०द्वारे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड त्यांच्या बांधकाम, कॉर्पोरेट आणि शिक्षण क्षेत्रातील दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रदान करण्यात आला आहे.

फोटो

Web Title: Sushil Agarwal of Chalisgaon